गुकेश डोम्माराजू बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे.
गुकेश जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन ठरला आहे.
बुद्धिबळाच्या इतिहासात डी गुकेश हा विश्वविजेता बनणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
विश्वनाथन आनंद यांच्यानंतर डी गुकेश दुसरा भारतीय विश्वविजेता ठरला आहे.
चीनच्या दिग्गज डिंग लिरेनविरुद्ध जिंकून इतिहास रचणाऱ्या गुकेशने वयाच्या 18 व्या वर्षी हा पराक्रम गाजवला आहे.
डी गुकेश यांचा जन्म 29 मे 2006 रोजी तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये तेलुगू कुटुंबात झाला.
गुकेशचे आई-वडील आंध्र प्रदेशातील गोदावरी डेल्टा भागातील आहेत.
गुकेशचे वडील डॉ. रजनीकांत हे कान-नाक आणि घसा (ENT) सर्जन आहेत. त्याची आई पद्मा मायक्रोबायोलॉजिस्ट आहे.