जपान देशातील जन्मदर कमालीचा घसरला आहे.
जपान देशातील जन्मदर आतापर्यंतच्या विक्रमी निचांकी पातळीवर घसरला आहे.
जपान लोकसंख्येच्या संकटाचा सामना करत आहे. येथील लोकसंख्येत प्रचंड घट झाली आहे.
त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून सरकारने चार दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे.
एप्रिल 2025 पासून मेट्रो सिटी सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यात फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी मिळणार आहे.
आठवड्यातून फक्त चार दिवस काम करुन सरकार जोडप्यांना रोमान्स करण्यासाठी वेळ देत आहे.
यामुळे जन्मदर वाढवण्यात मदत होईल, असा उद्देश आहे.
याशिवाय मुलांच्या संगोपनासाठीही सरकार खास 'बाल संगोपन रजा'देखील देणार आहे.
जपान सरकार घटत्या लोकसंख्येची समस्या सोडवपण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे.