बँकेच्या लॉकरची चावी हरवण्याची शक्यता असते.
पण, याबद्दल जास्त काळजी करण्याची देखील गरज नाही.
कारण लॉकरची चावी हरवल्यास बँक नवीन चावी देते.
मात्र यासाठी ग्राहकांना वेळेत बँकेला कळवावे लागते.
लॉकरची चावी आणि लॉकर नंबरच्या डिटेल्ससह बँकेत एक अर्ज द्यावा लागतो.
यासोबतच पोलिस रिपोर्ट तक्रारीची फोटोकॉपीही द्यावी लागते.
यानंतर बँक तुमच्याकडून नवीन चावीसाठी शुल्क आकारते.
त्यानंतर बँक तुम्हाला नवीन चावी देते.
लॉकर भाड्याने घेणाऱ्या ग्राहकाला निर्धारित वेळेवर आणि स्थानावर उपस्थित राहणे आवश्यक असते.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.