दोन बँकेत खाते असतील तर 10 हजार रुपये दंड, RBI चा नवा नियम काय सांगतो? भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतील, तर तुम्हाला काळजीपूर्वक व्यवहार करावा लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) च्या नव्या नियमानुसार, तुमच्या खात्यातून संशयास्पद व्यवहार आढळल्यास, तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तुमच्या खात्यातून संशयास्पद व्यवहार आढळल्यास तुमच्या खात्याची तपासणी केली जाईल. तुमच्या खात्याच्या व्यवहारात अनियमितता आढळल्यास तुमचं खातं फ्रीज करण्यात येईल आणि तुम्हाला दंडही बसू शकतो. RBI च्या नवीन नियमानुसार, दोन बँक अकाऊंट असणे गैरकायदेशीर नाही. अनेक जण बचत आणि पगार यासाठी वेगवेगळी बँक खाती वापरतात. दरम्यान, तुमच्या बँक खात्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन कडक नियम लागू केले आहेत. यासाठी आता बँकाकडून प्रत्येक खातेदारांच्या व्यवहारावर नियमित लक्ष ठेवण्यात येईल. बँकेला कोणत्याही खात्यासंदर्भात संशयास्पद व्यवहार आढळल्यास बँक त्याची माहिती RBI ला देईल. त्यामुळे तुम्हीही बँक अकाऊंट वापरताना काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला आर्थिक नुकसाना होईल आणि कायदेशीर कारवाईही होऊ शकते.