केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केले.

Image Source: X

कवड्यांची माळ आणि शिंदेशाही पगडी देऊन अमित शाहांचा सन्मान करण्यात आला.

Image Source: X

रायगडावर आयोजित कार्यक्रमात अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.

Image Source: X

यावेळी अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगितला.

Image Source: X

राजमाता जिजाऊंना मनःपूर्वक प्रणाम करतो, जिजाऊंनी छत्रपतींना फक्त जन्मच दिला नाही, तर त्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या, असे अमित शाह म्हणाले.

Image Source: X

चारही बाजूनं शत्रूंनी घेरलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बांधला गेला आणि दिल्ली ते अटकपर्यंत सीमा गेल्या आहेत.

Image Source: X

रायगड केवळ पर्यटन स्थळ नव्हे तर प्रेरणा स्थळ तयार करणार आहोत, असेही अमित शाह यांनी म्हटले.

Image Source: X

छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापर्यंत मर्यादित ठेवू नका, असेही अमित शाह म्हणाले.