जगात सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती म्हणून जगदीप सिंग यांचे नाव समोर येत आहे.

ते इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) बॅटरी बनवणारी कंपनी क्वांटमस्केप चे माजी सीईओ आहेत.

जगदीप सिंग यांचा वार्षिक पगार तब्बल 17,500 कोटी रुपये इतका होता, ज्यामुळे त्यांचा दिवसाचा पगार 48 कोटी रुपये इतका होतो.

त्यांची ही प्रचंड कमाई त्यांच्या स्टॉक ऑप्शन्स आणि कंपनीच्या उत्तम कामगिरीवर आधारित होती.

क्वांटमस्केपने पारंपरिक लिथियम-आयन बॅटरीऐवजी सॉलिड-स्टेट बॅटरी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची ऊर्जा क्षमता वाढते आणि चार्जिंगचा वेळ कमी होतो.

जगदीप सिंग यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने या क्षेत्रात मोठे यश मिळवले.

त्यांच्या योगदानाला जागतिक स्तरावर चांगलेच नाव कामावले आहे.

जगदीप सिंग हे त्यांच्या अद्वितीय पगारातून आणि नेतृत्वाखालील यशामुळे सध्या जगातील सर्वाधिक पगार घेणारे व्यक्ती ठरले आहेत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.