रोनिन नावाच्या उंदराने 5 वर्षात 100 हून अधिक भू-सुरंग शोध लावून इतिहास रचला आहे.
या पराक्रमी उंदराने ऑगस्ट 2021 ते फेब्रुवारी 2025 या काळात तब्बल 109 भू-सुरंग आणि 15 न फुटलेले युद्धकालीन अवशेष शोधून काढले आहेत.
गुइन्न्सस वर्ल्ड रेकॉर्डने 'रोनान'च्या या महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेतली आहे आणि त्याला अधिकृतपणे विक्रमवीर घोषित केले आहे.
'रोनान' हा 'अॅपोपो' (APOPO) या बेल्जियममधील या संस्थेने ट्रेनिंग दिली होती.
'रोनान'चे प्रशिक्षक त्याला ' hardworking, friendly and relaxed' असे संबोधतात. त्याला भू-सुरंग शोधणे एक मजेदार खेळ वाटतो आणि तो आपले काम अत्यंत चोखपणे करतो.
या उंदरांची उत्कृष्ट वास घेण्याची क्षमता आणि हलके वजन त्यांना हे धोकादायक काम करण्यासाठी अद्वितीय बनवते.