न्यूयॉर्कमधील ब्रोन्क्स येथील एका अपार्टमेंटला काल (9 जानेवारी)भीषण आग लागली.



या घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.



19 मधील 9 ही लहान मुलं आहेत.



सीएनएनच्या रिपोर्टनुसार मेयर एरिक एडम्स यांनी सांगितले की 32 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.



घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.



आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना यश आले आहे.