पिंक रंगाच्या बिकनीवर दिशाने वेगवेगळ्या पोजमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. समुद्र किनारी बिकनीवर पहूडलेल्या दिशाचा लूक चाहत्यांची मनं घायाळ करत आहे. मालदीव तर तुझ्यामुळेच चालत आहे, अशा कमेंट चाहत्यांनी दिशाच्या फोटोवर केल्या आहेत. दिशाला चाहते कधी वॉटर क्वीन तर कधी वॉटर बेबी म्हणतात. दिशा नेहमीच इन्स्टग्रामवर बिकनीतील फोटो शेअर करत असते. फिटनेसच्या बाबतीत दिशा खूप अलर्ट असते. दिशाचा बिकनीतील जलपरीचा लूक तर चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. दिशा पटानी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिच्या फोटोंवर चाहत्यांचे असंख्य लाईक्स आणि कमेंट्स येत असतात. दिशाने आपली फरफेक्ट टोन्ड बॉडी फ्लॉन्ट केली आहे.