नवीन वर्षाचं सेलिब्रेशन सर्वत्र जोरात सुरु आहे. सेलिब्रेशनसाठी लोकांचा पर्यटनस्थळांकडे ओढा वाढला आहे. महाराष्ट्रात खासकरुन कोकणात जाण्यावर लोकांचा अधिक जोर असतो. महाराष्ट्रातील पहिलं फ्लाय बोर्डिंग जागतिक पातळीवर गेलेल्या तारकर्ली मधील कर्ली खाडीत सुरू झालं. सध्या कोकणात देश विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी किनाऱ्यावर दाखल झाले आहेत. फ्लाय बोर्डिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या उत्साहात तारकर्ली दाखल होत आहेत. जिल्ह्यातील तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, देवगड, शिरोडा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी आहे. विदेशात पाहिलेलं फ्लाय बोर्डिंग कोकणात सुरू झाल्याने त्याचा आनंद पर्यटकांना आहे. पर्यटक या फ्लाय बोर्डिंगचा आनंद लुटत आहेत. समुद्राच्या पाण्यावर चालण्याचा आनंद या फ्लाय बोर्डिंग वर घेता येतो.