डिसेंबर महिना म्हटला की लोक आतुरतेने नववर्षाची वाट पाहायला लागतात. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नववर्षाचा जल्लोष वाढतो. संपुर्ण जगात नवं वर्षाचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मोठ्या प्रमाणात सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. देशभर आनंद आणि उत्सवाचं वातावरण आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी केक कापले. संपूर्ण देश रोषणाईने उजळून निघाला आहे. देशभर सर्वत्र नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच वातावरण आहे. अनेक धार्मिक स्थळांवर पूजापाठ केले जात आहे. देशभर विविध ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे.