आज नववर्षाचा पहिला दिवस. देशभरात न्यू ईयरचं जल्लोषात साजरा करण्यात आलं.
अशातच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा इतिहास रचला आहे.
इस्रोनं नव्या वर्षातली पहिली अंतराळ मोहीम सुरू केली असून आपल्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपणंही इस्रोनं केलं आहे.
इस्रोनं 1 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी 'क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह' (एक्सपोसॅट) मिशनचं प्रक्षेपण केलं.
2023 मध्ये चांद्रयान-3 मिशनद्वारे चंद्रावर पोहोचल्यानंतर आणि आदित्य एल-1 मिशनद्वारे सूर्याकडे प्रवास सुरू केल्यानंतर, इस्रोनं यावर्षी अंतराळ क्षेत्रात पहिले पाऊल टाकलं आहे.
इस्रोनं सांगितलं की, नव्या वर्षातील पहिली मोहीम आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आली.
मिशनच्या प्रक्षेपणामुळे, कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी
अवकाशात विशेष खगोलशास्त्र वेधशाळा पाठवणारा भारत हा जगातील दुसरा देश बनला आहे.
एक्सपोसॅट ही संशोधनासाठी एक प्रकारची वेधशाळा आहे,
जी अवकाशातील कृष्णविवर आणि न्यूट्रॉन ताऱ्यांबद्दल अधिक माहिती गोळा करेल.