अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू आहे.



उत्तर भारतात गेल्या दोनशे ते चारशे वर्षात मंदिराची अशी रचना झालेली नाही.



'श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' या तीर्थक्षेत्राच्या मालकीचा आता 70 एकरांचा परिसर असेल.



या मंदिरात बारा दरवाजे असतील, महाद्वार आणि गर्भगृहाचा दरवाजा हे मुख्य दरवाजे आहेत.



राम मंदिराचा परकोटा 732 मीटर लांब असेल आणि 14 फूट रुंद असेल.



जमिनीपासून 21 फूट उंचीपर्यंत हे ग्रॅनाईट लावलं गेलेलं आहे.



जवळपास 25000 भाविकांचे सामान ठेवण्याची व्यवस्था केली आहे.



याच परिसरामध्ये लॉकर,चिकित्सालय,हॉस्पिटल असेल.



मंदिर परिसरामध्ये बाथरूम आणि वॉशरूम यांची विशेष सोय करण्यात आली आहे.



यात 500 शौचालय आणि स्नानगृह असतील.