महाराष्ट्रात सर्वत्र थंडीचे वारे वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातही खूप थंडी वाढत आहे. पुणेकर रस्त्यावर फिरताना तुम्हाला स्वेटरशिवाय दिसणार नाही. इतकेच काय पुणेकरांनी आपल्या लाडक्या बाप्पालाही स्वेटर घातलं आहे. बाप्पाचही वाढत्या थंडीपासून संरक्षण केल आहे, असे म्हणता येईल. पुणे शहरातील प्रसिद्ध सारसबाग येथील तळ्यातल्या गणपतीला स्वेटर अन् कानटोपी परिधान करण्यात आली. ही परंपरा गेल्या 40 वर्षांपासून चालू आहे. संध्याकाळी आरती झाली की बाप्पाला स्वेटर,कान टोपी, मफलर घातलं जातं. अनेक भाविक असे सुंदर वस्त्र बाप्पाला अर्पण करण्यासाठी आपल्या घरी तयार करतात. बाप्पाचे लोकरी वस्त्र परिधान केलेलं हे रूप पाहण्यासाठी भाविक मंदिरांमध्ये गर्दी करतात.