भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांत देशात ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या 4033 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 1552 लोक या आजारातून बरे झाले आहेत. या आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे समोर येत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 1216 ओमायक्रॉन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्याचवेळी, राजस्थानमध्ये दुसऱ्या क्रमांकावर रुग्णांची नोंद झाली आहे. राजस्थानमध्ये आतापर्यंत 529 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, दिल्लीतील ओमायक्रॉनची रुग्णांची संख्या आता 513 झाली आहे.