मुंबईत गेले काही दिवस पारा घसरला आहे. सोमवारी सकाळीही थंडीचा जोर पाहायला मिळाला. सध्या मुंबईतील सरासरी किमान तापमान 18 अंश सेल्सिअस आहे. हे तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यात 7 जानेवारीपासून 10 जानेवारी दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार, मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली परिणामी तापमान घसरले आहे. मुंबईतही काही ठिकाणी शुक्रवारपासून पावसाची रिमझिम पाहायला मिळाली. मुंबईतील वातावरणात सध्याला गारवा बघायला मिळत आहे.