एलईडी बल्बचा वापर केल्याने विजेचे बिलदेखील कमी येते. यामुळे विजेसारख्या अत्यावश्यक साधनांची बचत होण्यासही मदत होते.



विशेष म्हणजे हा व्यवसाय उभारण्यासाठी सरकारकडून एलईडी बल्ब बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.



तुम्हाला LED बल्ब बनविण्याचे प्रशिक्षण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून मिळते. एलईडी बल्ब बनविणाऱ्या कंपन्यांकडून बल्ब बनविण्याचे प्रशिक्षणही तुम्ही घेऊ शकता.



बल्ब बनविण्याव्यतिरिक्त, तुम्हाला पीसीबीचे बेसिक, एलईडी ड्राईव्ह, बल्ब साहित्य खरेदी, फिटिंग-चाचणी, मार्केटिंग, सरकारी सबसिडी स्किम इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.



जर तुम्हाला हा व्यवसाय लहान स्तरापासून सुरू करायचा असेल, तर तुम्ही फक्त 50,000 रुपयांच्या गुंतवणुकीने सुरू करू शकता.



एक बल्ब बनविण्यासाठी 50 रुपये खर्च येतो, तुम्ही100 रुपये प्रति बल्ब विकू शकता. अशा प्रकारे दुप्पट नफा मिळवून दर महिन्याला 2000 बल्ब बनवून किमान 1 लाखाचा नफा कमावू शकता.