आज माघी शुद्ध अर्थात जया एकादशी.. या निमित्ताने विठ्ठल मंदिराला आकर्षक फुल सजावट करण्यात आली आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आजच्या माघ शुद्ध दशमीलाही अनन्यसाधारण महत्व आहे. पंढरपुरात विठुराया आणि रुक्मिणी मातेचं दर्शन करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. माघी एकादशीसाठी चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडायची व्यवस्था केली आहे. माघी यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात पोहोचले आहेत. विठ्ठल मंदिराला या निमित्ताने आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं आहे. माघी यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात दाखल करण्यात आहे.