'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील मुनमुन दत्ताच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
मुनमुन 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत 'बबिता जी' ही भूमिका साकारते.
2018 मध्ये सोशल मीडियावर एका व्यक्तीनं आक्षेपार्ह कमेंट करून मुनमुनला ट्रोल केलं.
ट्रोलरला उत्तर देऊन मुनमुननं त्याला ब्लॉक केलं होतं.
मुनमुन त्या ट्रोलरला म्हणाली होती की, 'तुझ्या सारख्या माणसाकडे कोणी लक्ष देणार नाही पण मी विचार केला की ब्लॉक करण्याआधी तुला तुझी लायकी काय आहे ते सांगायला पाहिजे.'
पुढे ती म्हणाली, 'तु तुझा हा कुरूप चेहरा दुसऱ्या कोणाला तरी दाखव. '
मुनमुन सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.