वेगवेगळ्या लूकमधील फोटो दीपिका सोशल मीडियावर शेअर करते. दीपिकाने नुकताच एक खास फोटो शेअर केला. दीपिकाने शेअर केलेल्या फोटोला कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. दीपिकाने तिचा सेल्फी शेअर करत कमेंटमध्ये लिहिले, 'केस बांधण्याचा मी प्रयत्न केला पण मी अयशस्वी ठरले.' एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'तुझ्याकडे एवढे पैसे आहेत. तु शॅम्पू आणि तेल विकत घे' दुसऱ्याने लिहिले, 'अंघोळ करून घे थंडी नाहिये एवढी'. दीपिकाच्या एका चाहत्याने कमेंट केली, 'तु केसांना एकदा साबण लावून पाहा.' अशा अनेक भन्नाट कमेंट्स नेटकऱ्यांनी दीपिकाने शेअर केलेल्या फोटोला केल्या आहेत.