भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा विवाहबंधनात अडकला आहे. ऋतुराजने उत्कर्षा पवार हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. ऋतुराजने त्याच्या विवाहासाठी महाबळेश्वरची निवड केली. उत्कर्षा ही देखील एक क्रिकेटपटू आहे. सध्या ऋतुराजच्या फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. ऋतुराजने कुटुंबिय आणि नातेवाईंकाच्या उपस्थितीत उत्कर्षासोबत लग्नगाठ बांधली. ऋतुराज आणि उत्कर्षा हे दोघे चांगले मित्र होते.त्यानंतर त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या प्रत्येक समारंभात उत्कर्षा आणि ऋतुराजच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून आला. ऋतुराजने यंदाच्या आयपीएलच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे.