साऊथ अभिनेत्री नयनतारा सध्या पती विग्नेश शिवनसोबत परदेश दौऱ्यावर आहे. दोघेही बार्सिलोनामध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. या ट्रीपची झलक ते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना देत आहेत. विग्नेशने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या कपलचे फोटो चांगलेच चर्चेत आले आहेत. दोघांचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. दोघांचे फोटो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता या दोघांचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसत आहेत. विग्नेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो नयनतारवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. नयनताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ती सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. नयनतारा लवकरच शाहरुख खानसोबत 'जवान' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय नयनताराचा 75वा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तिच्यासाठी आणि चाहत्यांसाठी खास असणार आहे. अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवनची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघे सध्या एकत्र सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. (Photo : @wikkiofficial/IG)