अभिनेत्री माधुरीसाठी वय म्हणजे फक्त एक आकडा आहे. ती आज देखील अत्यंत सुंदर दिसते. 80-90 ची दशकं गाजवलेली माधुरी आजही तितकीच सुंदर दिसते. तिच्या सौंदर्याने आजही लाखोजण घायाळ होऊ शकतात. बॉलीवुडमधून तिने विश्रांती घेतली असली तरी ती काही निवड सिनेमांमध्ये दिसली आहे. फेम-गेम या वेब सिरीजमध्ये देखील ती नुकतीच झळकली होती. तिचे सर्व प्रकारच्या लूकमधील फोटो अत्यंत दिलखेचक असतात. वेस्टर्न कपड्यांमध्ये आजही ती हॉट दिसते. तर ट्रेडिशनल ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य आणखी खुलतं. तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत आहेत.