आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. सर्वत्र या उत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत असताना दिसून येत आहे. नवरात्रीच्या निमित्तानं विविध विषयांवर वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती देखील केली जात आहे. महिलांवरील अत्याचार थांबावेत याकरता जनजागृती करण्यासाठी वेंगुर्ले आरवली समुद्रकिनारी रविराज चिपकर यांनी वाळूशिल्प साकारलं आहे. आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. याचं पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुलें आरवली समुद्र किनाऱ्यावर रविराज चिपकर यांनी दुर्गा मातेचं वाळूशिल्प साकारलं आहे. या वाळूशिल्पाच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. महिलांवर होणारे अत्याचार होऊ नयेत यासाठी जनजागृती या वाळूशिल्पातून केली आहे. बलात्कार, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, वृक्षतोड हे सगळं थांबले पाहिजे यासाठी जनजागृती म्हणून हे वाळूशिल्प साकारलं आहे.