नवरात्र उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठानकडून काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीस सुरुवात झाली.

नवरात्र उत्सवात पुढील नऊ दिवस शहरातील विविध भागातून ही दौड काढण्यात येते

दसऱ्याच्या दिवशी या दौडीची सांगता होते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून पहाटे ध्वज पूजन करून दौडीस प्रारंभ झाला.

मशाल, तलवार धारक, ध्वज धारक हे दौडीच्या अग्रस्थानी असतात.

या दौडीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फाटा दौडीच्या मार्गावर तैनात करण्यात आला होता.

नवरात्र उत्सव सार्वजनिकपणे साजरा करण्यासाठी दुर्गामाता दौडीची संभाजी भिडे यांनी संकल्पना पुढे आणली.

तरुणांमध्ये हिंदू धर्माविषयी जागृती व्हावी यासाठी हा कार्यक्रम केला जातो.

1982 साली संभाजी भिडे यांनी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने या दुर्गामाता दौडीस सुरुवात केली होती.

नवरात्र उत्सवात पुढील नऊ दिवस शहरातील विविध भागातून ही दौड काढण्यात येते