राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्क्यांवर आले आहे. राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज 619 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 686 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण 3,709 सक्रिय रुग्ण संख्या आहे. गेल्या 24 तासांत देशात 4 हजार 912 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 28 हजार 487 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात 79,66,768 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.