महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या (Kulswamini Tuljabhavani Devi) शारदीय नवरात्र महोत्सव (Navratri Mahotsav) आजपासून सुरु झाला आहे.

दोन वर्ष कोरोनाचे (Corona Updates) निर्बंध असल्यानं उत्सवावर देखील निर्बंध होते.

आता निर्बंध हटल्यानं उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

नवरात्रीच्या (Navratri 2022) पहिल्या दिवशीच्या आधी मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा (Manchaki Nidra) संपवून आपल्या गर्भ घरात दाखल झाल्या.

यावेळी आई तुळजाभवानीच्या मूर्तीला पंचामृताचा विधिवत महाभिषेक करण्यात आला.

त्यानंतर पहाटे चार वाजता तुळजाभवानीची मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.  

नऊ दिवसाच्या घोर निद्रेनंतर आई तुळजाभवानीचे दर्शन झाल्याने पडत्या पावसात भाविकांनी विधिवत लोटांगण घालून मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेतले.

महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील भाविक देखील यावेळी मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दाखल झाले आहेत.  
 

ज्योत घेऊन जाण्यासाठी तरुण भक्तांनीही आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं आल्याचं पाहायला मिळत आहे. 

आई तुळजाभवानीच्या मंदिरावर केलेली मनमोहक रोषणाई ही या नवरात्राचे आकर्षण ठरले आहे.