ब्लीचमुळे शूजची चमक वाढते त्यामुळे पाण्यामध्ये थोडेसे ब्लीच मिसळून शूजवर लावावे.

व्हाईट टूथपेस्ट शूजवर लाऊन काहीवेळ तशीच राहू द्या, नंतर टूथब्रशने स्वच्छ करुन घ्या.

शूजवर धूळीचे डाग असतील तर स्पंजने स्वच्छ करावे आणि हलक्या हाताने डिटर्जंटयुक्त पाण्याने घासून डाग स्वच्छ करता येतील.

शूज स्वच्छ करताना आपण जो साबण किंवा डिटर्जंट वापरतो तो जितका सॉफ्ट असेल तितके चांगले.

व्हाईट शूज नेहमी मोकळ्या हवेत आणि सूर्यप्रकाशात वाळवावे.

शूज धुतल्यानंतर आणि डाग काढून टाकल्यानंतर नेल पॉलिश रिमूव्हर लावावे., जर काही डाग उरले असतील तर ते सहजपणे निघून जातील.

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र करुन त्याची पातळसर पेस्ट शूजवर लावा पांढर्‍या शूजची चमक पुन्हा मिळण्यास मदत होते.

मशीनमध्ये शूज धुतल्यांनी कधीकधी ते खराब होण्याची शक्यता असते.

सगळ्यात आधी हे नळाखाली वाहत्या पाण्यामध्ये स्वच्छ करावे. हे करताना थंड पाणी वापरा कारण थंड पाण्यामुळे कोणत्याही प्रकारचे डाग टिकून राहत नाहीत.

व्हाईट शूज स्वच्छ करण्यापूर्वी सगळ्यात आधी शूजच्या लेस काढून बाजूला ठेवा. जर शूजला लेस तशाच असतील तर शूज स्वच्छ होणार नाही.