तुम्ही दररोज नकळतपणे छोट्या-छोट्या प्लास्टिकच्या कणांचे सेवन करत आहात. याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल.



जगभरात प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्लास्टिकची विल्हेवाट लागत नसल्याने ते तसेच पडून राहते आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.



अनेक पदार्थांमधून मायक्रोप्लास्टिकचे कण तुमच्या शरीरात प्रवेश करतात. या प्लास्टिकचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.



प्लास्टिकच्या अगदी लहान कणांना मायक्रोप्लास्टिक असं म्हटलं जातं. मनुष्य नकळतपणे मायक्रोप्लास्टिकचे सेवन करतो. काही संशोधनात ही बाब समोर आली आहे.



काही संशोधनाच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर, दर आठवड्याला सरासरी 0.1 ते 5 ग्रॅम मायक्रोप्लास्टिक्स मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारे प्रवेश करू शकतात.



प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण सामान्यतः अन्न, पेय आणि श्वासाद्वारे आणि त्वचेद्वारे देखील शरीरात प्रवेश करू शकतात.



तुम्ही दररोज नकळतपणे छोट्या-छोट्या प्लास्टिकच्या कणांचे सेवन करत आहात. याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल.



पाणी, मीठ, मासे, बिअर, साखर आणि मध या पदार्थांसोबत प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण मानवी शरीरात प्रवेश करू शकतात.



मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर, हे प्लास्टिकचे सूक्ष्म कण (5 मिमी पेक्षा कमी) पचन, श्वसन आणि रक्ताभिसरण प्रणालींमध्ये जातात.



पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मायक्रोप्लास्टिकमुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. कारण त्यांच्यातील प्रदूषित पदार्थ अनेक आजारांशी निगडीत असतात.



मायक्रोप्लास्टिकमुळे हृदय आणि प्रजनन संबंधित समस्या तसेच मधुमेह, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळू शकते.



प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण म्हणजे मायक्रोप्लास्टिकचे कण पाणी, मीठ, मासे, बिअर, साखर आणि मध यांच्यासह मानवी शरीरात प्रवेश करतात.



संशोधनानुसार, प्रत्येक व्यक्ती दरवर्षी 11,845 ते 1,93,200 मायक्रोप्लास्टिक कण (7.7 ग्रॅम ते 287 ग्रॅम) गिळतो.