गोऱ्या रंगाचं आकर्षण आपल्याकडे नवं नाही. गोरं होण्यासाठी जर तुम्ही फेअरनेस क्रीम वापरत असाल तर सावधान.
तुम्ही वापरत असलेल्या क्रीममध्ये पारा आहे का हे आधी तपासून घ्या.
अकोल्यात फेअरनेस क्रीममधील पाऱ्यामुळे तीन महिलांच्या किडनीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं आहे.
20 वर्षीय बायोटेकच्या विद्यार्थिनीने अकोल्यातील तिच्या ब्युटीशियनकडून विकत घेतलेलं लोकल फेअरनेस क्रीम वापरण्यास सुरुवात केली होती.
क्रीम वापरण्यास सुरुवात केल्यानंतर लगेचच लोक तिच्या 'ग्लो' आणि 'फेअर लूक'चं कौतुक करु लागले.
यानंतर तिची आई आणि मोठ्या बहिणीने देखील ही क्रीम वापरण्यास सुरुवात केली.
पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. त्यांच्या किडनीवर याचा दुष्परिणाम झाला.
2022 मध्ये काही महिन्यांनंतर त्या तिघींना ग्लोमेरुलोनेफ्रायटिस हा आजार जडला. या आजारात किडनीतील लहान फिल्टर खराब होतात.
केईएमच्या आयुर्वेद प्रयोगशाळेत क्रीम्ससह विविध वस्तूंच्या चाचण्या केल्याच्या निकालाने डॉक्टरांना धक्का बसला.
डॉ. जमाले यांनी सांगितले की, या स्किन क्रीममध्ये पाऱ्याची पातळी 1 पीपीएमच्या सुरक्षित निकषांपेक्षा जास्त होती.