‘मिस मार्वल’ची निर्मिती बिशा के अली यांनी केली आहे.

हे मार्वल पात्र कॉमिक्स कमला खानच्या पात्रावर आधारित आहे.

कमला खान ही एक मुस्लिम अमेरिकन मुलगी आहे, जी तिच्या जबाबदाऱ्या पार पाडत सुपरहिरो बनते.

मार्वल कॉमिक्समधील ती पहिली मुस्लिम सुपरहिरो आहे.

सध्या, मिस मार्वलचा ट्रेलर रिलीज होताच इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

या ट्रेलरला यूट्यूबवर अवघ्या काही तासांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

मार्वल युनिव्हर्समधली या सिरीजमध्ये इमान वेलानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे

तर सागर शेख, अरामिस नाइट, मॅट लिंट्झ, झेनोबिया श्रॉफ आणि मोहन कपूर हे देखील महत्त्वाच्या भूमिका निभावणार आहेत.

सहा भागांची ही सिरीज 8 जूनपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.