नाशिकमध्ये गोदावरीत कार अडकली!

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP LIVE

नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

Image Source: ABP LIVE

या वाढत्या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी साचू लागले आहे.

Image Source: ABP LIVE

तर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.

Image Source: ABP LIVE

याच दरम्यान, गोदावरी नदीच्या पात्रालगत रस्त्यावर पार्क केलेली एक कार अचानक वाढलेल्या पाण्यात अडकली आहे.

Image Source: ABP LIVE

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कार तिथे पार्क करण्यात आली,

Image Source: ABP LIVE

तेव्हा तिथे पाणी नव्हते. मात्र अल्प वेळातच नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने ती गाडी पाण्यात अडकली.

Image Source: ABP LIVE

स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने सध्या गाडी बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Image Source: ABP LIVE