युवकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

गेल्या सरकारपेक्षा जास्त वेगाने काम केलं, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

माझं भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला मी आज नाशिकमध्ये आहे.

हा केवळ योगायोग नाही, देशातील अनेक महान विभूतींचा संबंध महाराष्ट्राच्या धर्तीशी संबंध आहे.

नाशिक पंचवटी भूमीत प्रभू श्रीरामाने अनेक काळ व्यतीत केला. मी आज या भूमीला श्रद्धापूर्वक प्रणाम करतो.

मी देशवासियांना आग्रह करेन, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठाच्या पावन दिवशी देशातील सर्व मंदिरं, सर्व तीर्थक्षेत्रात स्वच्छता अभियान राबवा, श्रमदान करा.

आज भारत जगातील टॉप ५ अर्थव्यवस्था आहे.ही भारताच्या युवकांची ताकद आहे.

सहकाऱ्यांनो वेळ ही प्रत्येकाला एक संधी देते.वेळेचा हा सुवर्णक्षण आताचा अमृतकाळाचा हा कालखंड आहे.

तुमच्याकडे संधी आहे, इतिहास रचण्याची, इतिहासात तुमचं नाव नोंदवण्याची.

देशाच्या या अमृतकाळात युवकांनी भारताला नव्या उंचीवर घेऊन जायचं आहे.

येत्या कालखंडात तुम्ही असं काम करा की आगामी पिढ्या तुमच्या नावाचा गौरव करतील.