राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाला आहे. त्यामुळे नाशकात या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोवन येथील मोदी मैदानावर होणार आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नाशिकच्या काळाराम मंदिरााला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस त्यांच्या ताफ्यासह सज्ज झाले आहेत. नाशिक जिल्हा 'नो ड्रोन झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नाशिक जिल्हा 'नो ड्रोन झोन' करण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. 10 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.