आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नाशिकमधून करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदावरीची आरती करण्यात आली.

उद्धव ठाकरेंना पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

यावेळी पोलिसांनी कडेकोट नियोजन केले होते.

उद्धव ठाकरे रामकुंडावर दाखल होताच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

गोदाकाठावर ठाकरे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती.

गोदाकाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे अनेक बॅनर्स लावल्याचे यावेळी दिसून आले.

उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाताना त्यांनी भगवे कपडे परिधान केले होते.

तसेच त्यांनी गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या.

या पोशाखाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.