नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचे (Banana Farming) उत्पन्न घेतात



मात्र गेल्या तीन महिन्यांपासून केळीच्या दराची समस्या मोठ्या प्रमाणात भासत आहे.  



व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

शेतकरी केळीचे घड जनावरांना टाकत असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे . 



नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा आणि नंदुरबार तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पन्न घेतले जाते.

यावर्षी जिल्ह्यात पाच हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर केळीची लागवड झाली.

मात्र केळीला दोन ते तीन रुपये परत प्रति किलो दर मिळत आहे आणि त्यात व्यापारी मनमानी करत आहे.



व्यापारी केळीची तोड करण्यासाठी येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

त्यात आता दर मिळत नसल्याने शेतकरी केळीचे घड जनावरांना खाण्यास टाकत असल्याचे समोर आले आहे.