दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांचे निधन झाले आहे.
नंदामुरी तारका रत्न यांनी वयाच्या 39 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
उपचारादरम्यान नंदामुरी यांची प्रकृती खालावली असून त्यांचे निधन झाले आहे.
नंदामुरी यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
नंदामुरी तारका रत्न यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे.
नंदामुरी तारका रत्न यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत राजकारणातदेखील नशिब आजमावलं आहे.
नंदामुरी तारका रत्न हे दाक्षिणात्य अभिनेता ज्यूनिअर एनटीआरचे चुलत भाऊ होते.
नंदामुरी तारका रत्न यांचा यांचा पहिला सिनेमा 'ओकाटो नंबर कुर्राडु' हा आहे.
आंधप्रदेशचे मुख्यमंत्री वाई.एस. जगन मोहन रेड्डी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी नंदामुरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
ज्यूनिअर एनटीआरच्या तुलनेत नंदामुरी तारका यांना कमी लोकप्रियता मिळाली आहे.