'बिग बॉस' फेम शिव ठाकरे सध्या चर्चेत आहे.

आता अमरावतीकरांनी शिवचं जंगी स्वागत केलं असून नुकत्याच एका मुलाखतीत शिवने वीणा जगतापबद्दल भाष्य केलं आहे.

'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे आणि वीणा जगतापने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शिव वीणाबद्दल भाष्य करत म्हणाला,वीणा आणि माझा ब्रेकअप झाला असला तरी मी बिग बॉसमध्ये सहभागी होण्यापूर्वी आम्ही संवाद साधला होता.

शिव ठाकरे पुढे म्हणाला,बिग बॉस मराठी 2' आणि 'बिग बॉस 16' हे दोन्ही माझ्यासाठी खूप खास आहेत.

शिव ठाकरे आणि वीणा जगताप 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले होते.

बिग बॉसच्या घरातचं त्यांची चांगली मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

शिव आणि वीणाचा नंतर ब्रेकअप झाला आणि त्यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली.

शिव ठाकरे आणि वीणा जगतापची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.

शिव आणि वीणा एकत्र यावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.