अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर सक्रिय असते. हिना खान तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच हिना खानने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हिना खान सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. पर्पल मिनी ड्रेसमधील काही फोटो हिनाने शेअर केले आहेत. डोळ्यांवर मोठा गॉगल घालून हिनाने तिचा लूक पूर्ण केला आहे. हिनाने कानात मोठ्या आणि स्टाईलिश रिंगा घातल्या आहेत. बॉयफेंड रॉकीसोबतचाही एक फोटो हिनाने शेअर केला आहे. मिनी ड्रेसमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील हिनाचे हे फोटो आवडले आहेत.