केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची लेक शनेल इराणी नुकतीच लग्नबंधनात अडकली असून नुकतचं तिच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडलं आहे. शनेल इराणी आणि अर्जुन भल्ला यांच्या वेडिंग रिसेप्शनला उद्योजक, राजकारणी मंडळी तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, एकता कपूर, मौनी रॉय, जितेंद्र, रोनित रॉयसह अनेक कलाकारांनी शनेल आणि अर्जुनच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती. शनेल आणि अर्जुनच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राजस्थानातील खिमसार या 500 वर्ष जुन्या किल्ल्यात शनेल आणि अर्जुनचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. मुंबईतील एका आलिशान रिसॉर्टमध्ये शनेल आणि अर्जुनच्या वेडिंग रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. स्मृती इराणी यांनी 2021 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून शनेल आणि अर्जुनच्या नात्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. शनेल आणि अर्जुन दोघेही वकील असून वकिलीचं शिक्षण घेत असताना त्यांची मैत्री झालेली आहे. शनेल-अर्जुनच्या लग्नसोहळ्यातील फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शनेल आणि अर्जुनने लग्नात संस्कृती जपण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.