बॉलिवूडचा सुपरस्टार कार्तिक आर्यनचा 'शहजादा' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. एकीकडे शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा धुमाकूळ घालत असताना दुसरीकडे 'शहजादा'ची संथ सुरुवात झालेली आहे. कार्तिक आर्यन आणि कृती सेननचा 'शहजादा' हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'शहजादा' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'शहजादा' या सिनेमाने 7 कोटींची कमाई केली आहे. 'शहजादा' हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुण्ठपुरामुलू' या दाक्षिणात्य सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. 85 कोटींच्या बजेटमध्ये 'शहजादा' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'शहजादा' हा रोमॅंटिक सिनेमा असला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात मात्र कमी पडला आहे. एकीकडे 'पठाण' सारखा सिनेमा असताना 'शहजादा' हा पाहावा असा प्रश्न सिनेरसिक उपस्थित करत आहेत. शाहरुखच्या 'पठाण'चा कार्तिक आर्यनला चांगलाच फटका बसणार आहे.