विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सीन वॉर'मध्ये नाना पाटेकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. नाना पाटेकरांचा 'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा 11 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'द वॅक्सीन वॉर' सिनेमात नाना कोणती भूमिका साकारणार हे अद्याप समोर आलेले नाही. मातीशी नाळ जोडलेला 'आपला माणूस' अशी नानांची ओळख आहे. हरहुन्नरी कलावंत तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे नाना पाटेकर सध्या 'द वॅक्सीन वॉर' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी मुरुड-जंजीरा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. नाना पाटेकर यांनी 1978 साली 'गमन' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. नानांना 1986 साली एन.चंद्रा यांच्या 'अंकुश' या सिनेमाने खरा ब्रेक दिला. नानांनी 'हमिदाबाईची कोठी' या नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केलं आहे.