भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.

महेंद्रने निर्माता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

'धोनी एन्टरटेनमेंट प्रायवेट लिमिटेड'च्या बॅनरखाली महेंद्रने आपल्या पहिल्या-वहिल्या सिनेमाची घोषणा केली आहे.

महेंद्र सिंह धोनीच्या पहिल्या सिनेमाचं नाव 'एलजीएम : लेट्स गेट मॅरिड' आहे.

'लेट्स गेट मॅरिड' हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'धोनी एन्टरटेनमेंट'ने सोशल मीडियावर या सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे.

मोशन पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,धोनी एन्टरटेनमेंट या निर्मितीसंस्थेअंतर्गत पहिली कलाकृती सादर करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत.

हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू हे कलाकार 'एलएसजी : लेट्स गेट मॅरिड' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

रमेश थमिलमणी 'लेट्स गेट मॅरिड' या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

महेंद्र सिंह धोनी आपल्या पहिल्या सिनेमाची अत्यंत कमी बजेटमध्ये निर्मिती करणार आहे.