‘चित्रपट चित्रपटासारखाच पाहावा, त्यातून तेढ निर्माण करू नये!’, ‘द कश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकरांची प्रतिक्रिया ‘मला असं वाटतं की, इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहणे हे गरजेचे आहे आणि त्यांनी एकत्रच राहावे. नाना म्हणाले ‘चित्रपटाविषयी तेढ कुठला समाज निर्माण करतो अशातला भाग नाहीये. ही तेढ जर कोणी निर्माण करत असेल, तर त्या माणसाला नक्की प्रश्न विचारा. ही तेढ जर कोणी निर्माण करत असेल, तर त्या माणसाला नक्की प्रश्न विचारा. चित्रपट आहे तो चित्रपटासारखाच पाहावा. त्यातील वस्तुस्थिती कुणाला पटेल, कुणाला नाही पटणार. यावरून गट निर्माण होणं साहजिक आहे. पण, म्हणून त्यातून समाजात तेढ निर्माण होणं हे काही योग्य नाही’, असे अभिनेते नाना पाटेकर म्हणाले.