मिस युनिव्हर्सचा किताब भारतात आल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता होती ती मिस वर्ल्ड 2021 चा किताब येण्याची...

मात्र यंदाची मिस वर्ल्ड 2021 चा किताब पोलंडची कॅरोलिना बिलाव्स्का हिने पटकावला आहे.

यंदाची ही 70 वी मिस वर्ल्ड स्पर्धा होती. ज्यामध्ये 97 देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते.

हा कार्यक्रम यापूर्वी 2020 मध्ये होणार होता, परंतु कोविडमुळे तो पुढे ढकलण्यात आला होता.

यावेळी फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2020 मनसा वाराणसीने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

यंदाची मिस वर्ल्ड 2021 ही पोलंडची कॅरोलिना बिलाव्स्का आहे.

युनायटेड स्टेट्सची श्री सैनी ही पहिली उपविजेती आणि कोट डी'आयव्होरची ऑलिव्हिया येस ही दुसरी उपविजेती आहे.

कॅरोलिनाने 17 मार्च (IST) रोजी सॅन जुआन, पोर्तो रिको येथे आयोजित मिस वर्ल्ड स्पर्धेची प्रतिष्ठित 70 वी आवृत्ती जिंकली.