यंदाची मिस वर्ल्ड 2021 चा किताब पोलंडची कॅरोलिना बिलाव्स्का हिने पटकावला आहे.



यंदाची ही 70 वी मिस वर्ल्ड स्पर्धा होती. ज्यामध्ये 97 देशांतील स्पर्धक सहभागी झाले होते.



मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत असलेल्या कॅरोलिनाला पीएचडी करण्याची इच्छा आहे.



सध्या मॉडेल म्हणून काम करत असताना तिला मोटिव्हेशनल स्पीकर बनण्याची आशा आहे.



तिला पोहणे आणि स्कूबा डायव्हिंग आणि टेनिस आणि बॅडमिंटन खेळणे आवडते.



वाढत्या कोविड प्रकरणांमुळे मिस वर्ल्ड स्पर्धा ही दोन भागात आयोजित करण्यात आली होती.



एक डिसेंबर 2021 मध्ये आणि पुन्हा मार्च 2022 मध्ये ठेवण्यात आली होती.