कोरोना काळात शेतकऱ्यांना त्यांचा कांदा सरासरी 5 रुपये किलोने विकावा लागला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला बाजारपेठा खुल्या झाल्या. कांदा खरेदी-विक्रीसाठी भारतात दोन नंबरची बाजार समिती म्हणून पुण्याच्या चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीला ओळखलं जातं. पण होळीमुळं अनेक बाजारपेठा बंद आहेत, त्याशिवाय इथला परप्रांतीय मजूर होळी साजरी करण्यासाठी आपापल्या घरी गेला. त्यामुळे देशातील बाजारातून कांद्याची मागणी घटली, परिणामी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळं महागाईचा भडका उडवलाय. त्यामुळे कांदा ही भाव खाईल अशी अपेक्षा होती. पण होळीच्या सणाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा अक्षरशः भंग केला.