लवकरच बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार आहेत.



21 फेब्रुवारी रोजी फरहान आणि शिबानी कोर्ट मॅरेज करणार आहेत.



पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी 21 फेब्रुवारी रोजी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत.



कोर्ट मॅरेज झाल्यानंतर ते रिसेप्शनचा कार्यक्रम पार पडेल असं म्हटलं जात आहे.



फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली.



फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट घेतला.



अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती.



शिबानी आणि फरहान यांनी अजून त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही घोषणा केली नाही.