नागपुरातील प्राणी संग्रहालयात आणले 30 ते 34 फुटांपर्यंत वाढणारे जाळीदार अजगर

जगातील सर्वात जास्त लांबीपर्यंत म्हणजेच 30 ते 34 फुटांपर्यंत वाढू शकणारे

सहा जाळीदार अजगर म्हणजेच रेटिक्युलेटेड पायथॉन मंगलोरच्या प्राणी संग्रहालयातून आणले आहेत.

नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात आले आहेत.

जगातील सर्वात जास्त लांबीपर्यंत म्हणजेच 30 ते 34 फुटापर्यंत वाढू शकणारे हे अजगर आहेत.

हे जाळीदार अजगर सध्या किशोरावस्थेत असून त्यांची सध्याची लांबी 8 ते 10 फूट एवढी आहे.

साधारणपणे पुढील 4 वर्षात त्यांची लांबी 25 ते 30 फुटांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज आहे.

हे जाळीदार अजगर केवळ अंदमान निकोबार बेट आणि ईशान्य भारतातल्या घनदाट जंगलात आढळतात.

आता पर्यटकांना नागपूरच्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात

वाघ, बिबट, अस्वल, हरीण सनगाई यासह आता हे जाळीदार अजगर ही पाहता येणार आहे.