सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे.

सर्वच बाजापेठांमध्ये आंब्यांची आवक वाढली आहे.

मात्र नागपूरमध्ये चक्क एक एक किलोचा एका आंबा पाहायला मिळत आहे.

कळमना कृषी उत्पन्न बाजारसमिती एक किलोचा आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे.

हे बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.

मलगोबा, बैगनफल्ली या प्रजातीचे हे आंबे आहेत.

सध्या या आंब्यांची दक्षिण भारतातून नागपुरात आवक सुरु आहे.

अवकाळी पावसामुळे फळगळ झाल्याने शिल्लक राहिलेले हे आंबे आकाराने मोठे झाल्याचे जाणकार सांगत आहेत.

हे आंबे पाहून सगळेच आश्चर्यचकित होत आहेत.